मालमत्तेचे व्यवहार सुरक्षित करणारे इ-सर्टिफिकेट

मालमत्तेच्या व्यवहारात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी उत्तर दिल्ली महानगरपालिकेने आता ऑनलाईनवर भर दिला आहे. आता कोणत्याही मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी इ-सर्टिफिकेट दिले जाणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यवहाराच्या कागदपत्रांवर महानगरपालिकेचे वॉटरमार्क, खरेदीदार तसेच विक्रेत्याचा फोटा, बार कोड आणि क्‍यूआर कोडसह अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. इ-सर्टिफिकेटची प्रक्रिया अंगीकारल्याने महानगरपालिकेकडून म्यूटेशन सहजगत्या होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कागदपत्रांवरचे नाव, फोटो अन्य तरतूदींचा त्यावर उल्लेख असेल आणि त्याची नक्कल करता येणार नाही. यामुळे नागरिकांचे मालमत्ता खरेदी-विक्रीचे काम सहजसोपे होणार आहे. दररोज म्यूटेशन करणाऱ्यांची संख्या वाढण्याबरोबरच महसुलातही वाढ होईल, असा कयास बांधला जात आहे. अन्य नगरपालिकांनी देखील इ-सर्टिफिकेटची प्रक्रिया सुरू केली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)