मालमत्तेची देखभाल (भाग-२)

मालमत्तेची देखभाल (भाग-१)

सेवा शुल्क
मालमत्तेसाठी भाडेकरू शोधणे, मालमत्तेची डागडुजी करणे, भाडेकरूची पडताळणी करणे, करारनामा करणे, भाडेवसुली, करभरणा, देखभाल करणे, कराराचे नूतनीकरण किंवा नवीन भाडेकरू शोधणे आदी कामासाठी सेवा कंपन्या मालकाकडून फिस वसूल करतात. मालमत्तेची किंमत आणि स्थान यावर कंपनीची फिस अवलंबून असते. अशा प्रकारची सेवा केवळ अनिवासी भारतीयच घेतात असे नाही तर मोठमोठ्या महानगरातील नागरिक देखील व्यवस्थापन सेवा घेतात. उदा. मुंबईतील नागरिकांनी लोणावळा किंवा नाशिकला फार्म हाऊस खरेदी केला तर नियमितपणे तेथे जाणे शक्‍य नाही. अशावेळी स्थानिक कंपनीशी करार करून मालमत्तेची जबाबदारी संबंधितावर सोपवली जाते. याशिवाय अनेक मंडळींकडे सोसायटी असतात. अशा सोसायटीचे नियोजन करण्याचे काम एका माणसाचे नाही. तेव्हा सेवा व्यवस्थापनाची मदत घेतली जात आहे.

लोकांच्या गरजांत बदल
पूर्वी घर खरेदी करण्याचा किंवा बांधकाम करण्याचा उद्देश हा घराची गरज पूर्ण करणे हा होता. मात्र आज घर खरेदी करण्यासाठी एकच कारण पुरेसे राहिले नाही. नागरिक आता एकापेक्षा अधिक मालमत्ता खरेदी करण्याबाबत उत्सुक दिसून येतात. यासाठी व्यवस्थापन सेवेची मागणी आणि गरज वाढली आहे. देशातील एका व्यवस्थापन कंपनीच्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार काही दशकांपूर्वी जर आपले एखाद्या शहरात घर असेल आणि जर आपल्या दुसऱ्या शहरात राहायचे असेल तर आपण नातेवाईक, मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागत असे. घर भाड्याने देण्यासाठी भाडेकरू शोधणे, त्याची डागडुजी करणे याकामी मदतीची अपेक्षा केली जात असे. आजच्या स्थितीला आज अनेक भारतीय परदेशात स्थायिक झाले आहेत आणि ते आपल्या मालमत्तेपासून खूपच दूर राहत आहेत. या मालमत्तेच्या देखभालीसाठी किंवा लक्ष ठेवण्यास सांगण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रांना सांगण्यासाठी ते कचरतात. कधी कधी काही जण मदत करण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. तर काहीवेळेस नातेवाईक देखील मालमत्तेपासून दूर राहत असतील किंवा त्यांच्याकडेही वेळ नसेल तर अशावेळी आपल्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्यावरून मालक काळजीत राहतो. अशावेळी मालमत्तेकडे नियमित रूपाने लक्ष देता येत नाही आणि ती मालमत्ता ओझे बनू शकते. आजच्या स्थितीला नागरिकांसमोर अनेक अडचणी आहेत आणि अशावेळी मालमत्ता व्यवस्थापन सेवा लोकप्रिय होत चालली आहे.

– आशिष जोशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)