मालमत्तेची देखभाल (भाग-१)

आजच्या घडीला प्रत्येकाकडेच वेळ कमी आहे. गेल्या काही वर्षात मालमत्ता मालकांची संख्या वाढत चालली आहे. एकापेक्षा अनेक मालमत्ता अनेकांच्या नावावर असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही मालमत्ता एकाच शहरात, महानगरात असेल असे नाही. जर मालमत्ता परगावी असेल तर तेथे प्रत्येकवेळी जाणे शक्‍य नसते. अशा मंडळीना कामाच्या व्यग्रतेमुळे मालमत्तेची देखभाल, व्यवहाराकडे लक्ष देता येत नाही. अशा स्थितीत अनेक मंडळी आपली गरज पूर्ण करण्यासाठी प्रोफेशनल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणजेच व्यावसायिक मालमत्ता व्यवस्थापन सेवेची मदत घेतात. या कंपन्या मालमत्ता मालकाला संपूर्ण सेवा देण्याचे काम करतात आणि त्यापोटी शुल्क आकारतात.

व्यावसायिक दृष्टीने मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या किंवा संस्था या मालमत्तेशी निगडीत असलेल्या प्रत्येक लहानसहान गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात. उदा. व्यवस्थापन कंपनीच्या मदतीने कोणत्याही शहरातील मालमत्ता भाड्याने देता येते. नियोजित भाडेकरूचे भाडे, देखभालीचा खर्च, वीजबिलाचा खर्च, अनामत रक्कम किंवा आगाऊ भाडे याची संपूर्णपणे पाहणी करण्याचे काम संबंधित संस्था करते. याशिवाय मालमत्तेची देखभाल, डागडुजी करण्यासाठीही अशा संस्था सदैव तयार असतात. यासाठी मालमत्ता मालकाला अतिरिक्त वेळ देण्याची गरज भासत नाही. कारण भाडेकरूंची संपूर्ण माहिती मिळवण्याचे काम या संस्था करत असतात. भाडेकरुंचे व्हेरिफिकेशन, भाडेकरूची कंपनी, इतिहास यासंबंधी माहिती गोळा केली जाते. त्यामुळे आपली मालमत्ता भाड्याने देताना मालकाला फारसा ताण राहत नाही. मालमत्तेबाबत तो निश्‍चिंत राहतो. मालमत्तेसंबंधी किरकोळ अडचणी दूर करण्याचे काम संस्था करत असते. म्हणून अशा प्रकारच्या संस्थेची सेवा घेण्यासाठी सध्या मालक उत्सुक असल्याचे दिसून येतात.

मालमत्तेची देखभाल (भाग-२)

अनेक प्रश्‍नांचे उत्तर
या कंपन्या मालकांच्या अडचणी आणि समस्या दूर करण्यासाठी बऱ्याच अंशी मदत करू शकतात. अशा संस्था घर खरेदी किंवा विक्रीपासून भाडेकरू शोधण्यासाठी मदत करू शकतात. यासाठी भाडेकरूंची मुलाखत घेतली जाते आणि त्यांनी दिलेली माहिती पडताळून घेतली जाते. ही माहिती संबंधित मालकाला दिली जाते. कधी कधी मालकाच्या निकषानुसार भाडेकरू शोधण्याचे काम कंपनीला करावे लागते. काही मालकांना लहान कुटुंब हवे असते, तर काही मालक शाकाहारी कुटुंब भाड्याने देण्यास प्राधान्य देतात तसेच काही नोकरदार मंडळींना भाडेकरू ठेवण्याबाबत आग्रही असतात. अशावेळी मालकांप्रमाणे भाडेकरू शोधण्याचे काम कंपनीला करावे लागते. त्यानंतर भाडेकरू आणि मालक यांच्यात करार केला जातो आणि दोघांच्या संमतीने करारनामा केला जातो. हे सर्वप्रकारचे काम कंपनी करते. त्यामुळे मालकाच्या वेळेत बचत होते. प्रत्येकवेळी मालकाला घराच्या ठिकाणी हजर राहणे शक्‍य नाही. अशावेळी कंपनीचे कर्मचारी भाडेकरुची चाचपणी करतात. याशिवाय वीजबिल, प्लंबिंग, कारपेंटर, फर्निचर, रंगकाम, फरशीकाम आदीसंबंधी सर्व काम करण्याची जबाबदारी कंपनी स्वीकारते. मालमत्ता कर, मेंटेनन्स खर्च, आदींबाबत संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी कंपनी स्वीकारते. भाड्याने दिलेल्या मालमत्तेची सतत तपासणी केली जाते, जेणकरून भाडेकरू किंवा अन्य व्यक्तीकडून मालमत्तेची हानी होणार नाही. नियमित रूपाने कंपनी ही मालमत्तेचे फोटो आणि व्हीडिओ मालकाला पाठवत असते. जेणेकरून मालमत्तेचे अपडेट त्यांना मिळत राहतील.

– आशिष जोशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)