मालमत्ता कराची 1139 कोटींची थकबाकी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाला शहरातील मिळकतधारकांकडून एकूण 1139 कोटी 77 लाख एवढी थकबाकी येणे बाकी आहे. यामध्ये शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांची संख्या सर्वाधिक आहे. यामध्ये मोकळ्या जागा व बिगर निवासी जमिनींचा भरणा सर्वाधिक आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता 560 कोटी वसुलीचे उद्दीष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 305 कोटी मिळकत कर जमा झाला आहे. येत्या चार महिन्यांत 255 कोटी वसूल करण्याचे आव्हान या विभागासमोर आहे. दरम्यान या विभागातील एकूण 114 कर्मचाऱ्यांना मिळकत कर वसूल करण्याचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी उद्दीष्ट गाठणाऱ्या 18 कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. तर 50 ते 75 टक्के मिळकतकर वसूल करणाऱ्या 38 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 75 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत वसूल करणाऱ्या 17 कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तर 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वसुली करणारे 41 कर्मचारी कौतुकास पात्र ठरले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही थकबाकी अवैध शास्ती कर वसुल न झाल्यामुळे वाढली आहे. शास्तीकराचा प्रश्‍न राज्य सरकार पातळीवर प्रलंबित आहे. गेली चार वर्षापासून राज्य सरकार या शास्तीकर माफ करण्याचे वेळोवेळी आश्‍वासने देत आहे. त्या अनुषांने स्थानिक पदाधिकारी, आमदार व खासदार शास्तीकर भरु नका असे नागरिकांना वेळोवेळी आवाहन करीत आहेत. त्यामुळे नागरीक शास्तीकर भरत नाहीत. तसेच मोकळ्या जमिनीवरील व निवासी मिळकत कराची वसुली होत नाही. जप्तीची कारवाई होत नाही. त्यामुळे एकुण थकबाकीमधील सुमारे 550 कोटी रुपये मोकळ्या जमिनी व निवासी मिळकत कराची थकबाकी होत आहे. मिश्र वापर, बिगर निवासी व औद्योगिक वापराच्या मिळकतीवर जप्तीची कार्यवाही अत्यल्प होत आहे. त्यामुळे मिळकतकर थकबाकी वाढत आहे.

31 मार्च 2018 अखेर प्रलंबित थकबाकी
कर रक्‍कम – थकबाकीदारांची संख्या – एकूण थकीत रक्‍कम
1) एक लाखापेक्षा अधिक – 22,187 – 468 कोटी 89 लाख 26 हजार
2) 5 ते 10 लाख रकमेपर्यंतचे थकबाकीदार – 2,084 – 140 कोटी 21 लाख 67 हजार
3) 10 लाखापेक्षा अधिक थकबाकीदार – 957 – 351 कोटी 76 लाख 72 हजार
5) 1 कोटीपेक्षा अधिक थकबाकीदार – 35 – 178 कोटी 89 लाख 55 हजार

एकूण थकबाकीदार – 25,263 1139 कोटी 77 लाख 20 हजार

हे आहेत “टॉप टेन’ थकबाकीदार
थकबाकीदार मिळकतीचा प्रकार थकीत मिळकत कर
1) टाटा मोटर्स लि., पिंपरी मोकळी जागा 59,10,11,612
2) निगडी प्राधिकरण मोकळी जागा 15,52,69,225
3) टाटा मोटर्स, पॅसेंजर युनिट मोकळी जागा 14,53,14,896
4) टाटा मोटर्स, चिंचवड मोकळी जागा 13,33,81,614
5) हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्‍स मिश्र 11,30,80,571
6) सीआयआरटी, कासारवाडी मोकळी जागा 8,86,92,728
7) हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्‍स मोकळी जागा 7,83,54,175
8) एमआयडीसी विद्युत अभियंता मोकळी जागा 7,25,72,527
9) डायनामिक लॉजिस्टीक प्रा.लि. दिघी बिगरनिवासी 3,44,55,726
10) एमआयडीसी मोकळी जागा 3,30,71,453

मिळकत कर थकबाकी असेल तर नियमाप्रमाणे मालमत्ता जप्तीची कार्यवाही अपेक्षित असताना महापालिका जप्तीची कारवाई केली जात नाही. त्यामुळे मिळकत वसूल होत नाही. जप्तीची कारवाई वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई झालेली नाही. हे वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. तसेच यापूर्वी शास्ती कर व मिळकत कर वसूली कमी झाल्याबद्दल वर्ग तीनच्याच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस व वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. ही कारवाई रद्द करुन वर्ग एक व दोनचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
– दत्ता साने,
विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)