मालदीवच्या माजी अध्यक्ष नशीद यांची शिक्षा रद्द 

दहशतवादाच्या आरोपात दोषी ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द 

कोलंबो – माजी अध्यक्ष मोहमद नशीद यांना दहशतवादाच्या आरोपात दोषी ठरवून सुनावण्यात आलेली 13 वर्षांची शिक्षा मालदिवमधील सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली आहे. नशीद यांना 2015 साली दहहतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याचा निर्णय चुकीचा होता. त्यांच्यावरील आरोपदेखील चुकीचे होते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नशीद यांच्यावरील हा खटला राजकीय हेतूने प्रेरित होता, असे संयुक्‍त राष्ट्रानेही म्हटले होते.

नशीद यांना दहशतवादाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर ते वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात गेले होते. तेंव्हापासून ते भूमिगत झाले असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. नशीद यांचे राजकीय विरोधक अब्दुल्ला यमीन यांचा अध्यक्षीय निवडणूकीत पराभव झाल्यानंतर या महिन्यात नशीद मालदिवमध्ये परतले आहेत. दहशतवादाच्या आरोपातील दोषी ठरल्यामुळे यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या निवडणूक नशीद यांना लढवता आली नव्हती. मात्र त्यांच्या मालदिवन डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार मोहमद सोलिह यांनी यमीन यांचा पराभव केला होता.

नशीद यांच्या वकिलांनी न्यायायालयाच्या या निर्णयाबाबत समाधान व्यक्‍त केले आहे. राजकीय हेतूने प्रेरीत खटल्यामुळे नशीद यांच्यासारख्या निरपराध व्यक्‍तीला वर्षभर तुरुंगात रहायला लागले होते. याशिवाय गेल्या 35 महिन्यांपासून विजनवासात रहायला लागले. त्यांना राजकीय पदाच्या निवडणूकीत उभे राहण्यापासूनही वंचित रहावे लागले होते, असे नशीद यांचे वकिल हिसान हुसैन यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)