मालदिवमधील निवडणूकीत हस्तक्षेपास केंद्राचा नकार

नवी दिल्ली: मालदिवमधील अध्यक्षपदाच्या निवडणूकीमध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करायला हवा, अशी अपेक्षा भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्‍ते केली आहे. मात्र केंद्र सरकारने याविषयापासून दूरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मालदिवचे पदच्युत अध्यक्ष मोहंम्मद नशीद यांची स्वामी यांनी दोनच दिवसांपूर्वी कोलंबो इथे भेट घेतली होती. त्यानंतर मालदिवमधील निवड्‌णूकांमध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करण्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली होती. मात्र यावर प्रतिक्रिया देताना विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी “स्वामी यांचे मत त्यांचे स्वतःचे वैयक्तिक मत आहे. ते भारत सरकारचे मत नाही.’ असे उत्तर दिले.

स्वामी यांच्या भेटीदरम्यान नशीद यांनी मालदिवमधील संभाव्य अध्यक्षपदासाठी 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीची कल्पना दिली होती. या निवडणूकीमध्ये गैरप्रकार करून हंगामी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन हे सत्ता संपादन करण्याचा प्रयत्न करण्याची शक्‍यता त्यांनी बोलून दाखवली होती. जून महिन्यात मालदिवमधील निवडणूक आयोगाने नशीद यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)