मालदाडला भर उन्हाळ्यात भागवली जातेय वन्यजिवांची तहान

राजमुद्रा व शिवराय प्रतिष्ठानचा उपक्रम
संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील मालदाड, सोनाशी, सुकेवाडी या जंगल परिसरातील वन्य प्राणी, पशु, पक्षी यांची उन्हाळयात तहान भागवली जातेय. यासाठी आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मालदाड गावातील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने जंगलामध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते सोडण्यात आले.
मालदाड घाटात राजमुद्रा व शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने हे पाणी सोडण्यात आले. यावेळी राजहंस दुधाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, माजी जि. प. सदस्य भाऊसाहेब नवले, माजी पं. स. सभापती रावसाहेब नवले, राजहंस दुध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, अमृतवाहिनी बॅंकेचे संचालक कचरु फड, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाशभाऊ नवले, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय नवले, जालिंदर नवले, भाऊसाहेब नवले, भिमराज नवले, मच्छिंद्र नवले, शिवनाथ नवले, विलास नवले, उत्तम नवले, गोरख नवले, मच्छिंद्र नवले, राजू नवले, अरुण नवले, गवराम नवले, बाजीराव नवले व वन विभागाचे कर्मचारी शिंदे, कानवडे, ढवळे आदी उपस्थित होते.
यावेळी रणजितसिंह देशमुख म्हणाले, पशुपक्षी ही खरी सृष्टीची संपत्ती आहे. मानवांसाठी ते मोठे वैभव आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर पक्षांसाठी पाण्याची सोय करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. वाढत्या उन्हाची तीव्रता जानवत असल्याने पशु, पक्षी व वन्य जीव यांचे पिण्याच्या पाण्यावाचून मोठे हाल होत आहे. पाणी नसल्याने वन्य जीवांची भटकंती गावातील लोकसंख्येच्या ठिकाणी होत आहे, तसेच अनेक पशु, पक्षी व वन्यजीवांचे पाण्यावाचून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मालदाड गावातील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या सदस्यांचा या वन्यपक्षी व प्राण्यांसाठी हा अभिनव उपक्रम इतरांसाठी सातत्याने दिशादर्शक ठरणारा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)