मालगाडीवर चढून सेल्फी घेणे तरुणाला पडले महागात

अंबरनाथ :  मालगाडीवर चढून सेल्फी काढणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यावर चढून सेल्फी काढणाऱ्या तरूणाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागून तरुण गंभीर जखमी झाला. 

इलाराज अनिकेत असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. सेल्फी घेत असताना ओव्हर हेड वायरचा शॉक लागून तो खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्याची परिस्थिती नाजूक असल्याने त्याला पुन्हा मुंबईला रवाना करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)