मालखेडनजीक अपघातात एक ठार, दहा जखमी

कराड, दि. 12 (प्रतिनिधी)- माललेखडजवळ महामार्गावर बुधवारी सायंकाळी दुचाकी घसरल्याचे दिसल्याने वेग कमी करणाऱ्या ऍपेरिक्षाला पाठीमागून भरधाव स्वीफ्ट कारची जोरदार धडक बसली. या अपघातात 1 जण ठार तर 10जण जखमी झाले.
याबाबत माहिती अशी, मालखेडगावच्या हद्दीत महामार्गावर मोटरसायकल घसरून दोघे जण पडले. त्यामुळे मागून येणाऱ्या वडाप ऍपे रिक्षा चालकाने वेग कमी केला. त्याचवेळी रिक्षाच्या पाठीमागून भरधाव आलेल्या स्विफ्ट कारने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षातील 9 आणि दुचाकीवरील दोघे असे 11 जण जखमी झाले. यापैकी गुरूवारी दयानंद विष्णू बसवंत (वय 69, रा. नेर्ले, ता. वाळवा) या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत झाली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)