मालकी हक्क हरकतींबाबत आजची “डेडलाइन’

वर्ग-2 जमिनी : शासनाने पूर्वीच प्रसिद्ध केली आहे अधिसूचना

पुणे – राज्य शासनाने विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि गृहनिर्माण संस्था यांना दिलेल्या जमिनी त्याचबरोबर इनाम, वतन या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वर्ग-2 (मालक सरकार) अशी नोंद असते. या जमिनींची मालकी सरकारची असते. आता या भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी संबंधित संस्थेच्या अथवा शेतकऱ्यांच्या मालकी हक्काने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी शासनाने मुद्रांक शुल्क भरण्याची अट ठेवली आहे. या प्रसिद्ध केलेल्या नियमांवर हरकती नोंदविण्यासाठी उद्या (दि.1) अंतिम मुदत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वी शासनाकडे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या. त्यांचे संरक्षण होण्यासाठी त्यावर अतिक्रमणे होऊ नयेत, म्हणून शासनाने जमिनींचे वाटप केले. मात्र सातबारा उताऱ्यावर वर्ग -2 (मालक सरकार) अशी नोंद घालण्यात येते. त्यामुळे या जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अधिमूल्य भरावे लागते. अशा जमिनींसाठी प्रत्येक वेळी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते.

शाळा, महाविद्यालये, रुग्णालये त्याचबरोबर घरांसाठीही शासनाकडून विविध संस्थांना जमिनी अल्प दरात दिल्या जातात. 1966 पासून जागा राज्य सरकारकडून अशा जागा देण्यात येत आहे. या जमिनी देताना सातबारा उताऱ्यावर मालक म्हणून शासनाची नोंद असते. सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग-1 असा उल्लेख असतो. या जमिनींचे हस्तांतरण करताना प्रत्येक वेळी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. ही प्रक्रियेसाठी वेळ लागतो. या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनाने वर्ग दोनच्या जमिनी वर्ग-1 करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अधिसूचनाही शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र मालकी हक्काने जागा करण्यासाठी रेडी रेकनरच्या 50 ते 75 टक्के शुल्क भरण्याची अट घातली आहे. या सर्व नियमांवर हरकती अथवा सूचना नोंदविण्यासाठी 1 जानेवारी 2019 ही मुदत आहे. महसूल विभागाकडे याविषयी हरकत नोंदविता येणार आहे. या हरकतींवर सुनावणी घेऊन राज्य शासनाकडून अंतिम मसुदा प्रसिद्ध केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)