जेजुरीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जेजुरी – जेजुरी येथील धालेवाडी रस्त्यानजीक असलेल्या श्री. स्वामी समर्थनगरमधील 26 वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. 29) सायंकाळी 7 :30च्या सुमारास घडली. संतोष हिरामण चव्हाण (वय-26) जेजुरी असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत अंजना हिरामण चव्हाण यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून उपनिरीक्षक राजेश माळेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक फोजदार चंद्रकांत सातभाई करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)