मार्च महिन्यातही झाली निर्यातीत घट

नवी दिल्ली  – मार्च महिन्याच्या निर्यातीमध्ये 0.66 टक्‍क्‍यांनी घसरण नोंदविण्यात आली. मात्र, एकूण आर्थिक वर्षाची कामगिरी पाहता त्यामध्ये वाढ झाली आहे. 2017-18 मध्ये एकूण निर्यात 302.84 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. 2016-17 मध्ये हा आकडा 175.85 अब्ज डॉलर्स होता. मार्च महिन्यात निर्यात 29.11 अब्ज डॉलर्सची करण्यात आली होती. आयात मार्चमध्ये 7.15 टक्‍क्‍यांनी वाढत 42.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. यामुळे व्यापारी तूट 13.69 अब्ज डॉलर्स झाली. खनिज तेल आयात मार्चमध्ये महिन्याच्या आधारे 13.92 टक्‍क्‍यांनी वाढत 11.11 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. 2017-18 मध्ये तेल आयातीत 19.59 टक्‍क्‍यांनी वाढ होत 459.67 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचले. संपूर्ण आर्थिक वर्षातील व्यापारी तूट 156.83 अब्ज डॉलर्स होती.

हस्त कला उद्योगाच्या निर्यातीमध्ये घसरण नोंदविण्यात आली. देशाच्या निर्यातीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या या क्षेत्रात गेल्या 10 वर्षांत पहिल्यांदाच घसरण नोंदविण्यात आली. 2009-10 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मंदी आल्याने त्या वर्षात निर्यात घसरली होती. 2017-18 या गेल्या आर्थिक वर्षात हस्तोद्योग निर्यात 6.05 टक्‍क्‍यांनी घसरली. या क्षेत्राची निर्यात घसरण्याचे प्रमुख कारण जीएसटी असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात हस्त कला उद्योग क्षेत्राकडून 22,916 कोटी रुपयांच्या वस्तूंची निर्यात करण्यात आली होती. 2016-17 मध्ये ही निर्यात 24,392 कोटी रुपये होती. 2016-17 या आर्थिक वर्षात हस्त कला उद्योग क्षेत्राच्या निर्यातीमध्ये 13 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. या प्रकारात सर्वाधिक निर्यात इमिटेशन ज्वेलरी, हॅन्डप्रिन्टेड टेक्‍सटाईल, स्कार्फ आणि आर्टमेटल वेयर प्रोडक्‍टच्या निर्यातीत सर्वाधिक घसरण झाली. जीएसटी प्रणालीमध्ये निर्यातदारांचा 9 महिन्यांचा रिफंड अडकलेला आहे. यामुळे त्यांच्याकडील खेळत्या भांडवलामध्ये घसरण झाली. हातात भांडवल नसल्याने ऑर्डर्स रद्द करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)