मार्चनंतरच लोकल पूर्ण क्षमतेने धावणार?

पुणे- दौंड मार्गावरील प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात : रेल्वे प्रशासनाकडून टेक्‍नीकल अडचणी दूर

पुणे – रेल्वे प्रशासनाकडून पुणे- दौंड रेल्वे मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करून प्लॅटफॉर्मचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. मांजरी, कडेठाण, खुटबाव येथील प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे. यातील खुटबाव येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होऊन प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. कडेठाण प्लॅटफॉर्मचे काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. यातील सर्व कामे मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणे-दौंड लोकल आता पूर्ण क्षमतेने मार्चनंतरच धावणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या पंधरा वर्षांतील बहुप्रतीक्षीत आणि चर्चेत असलेली पुणे-दौंड लोकल सेवेत अथडळ्यांचे “विघ्न’ आले होते. त्यानंतर सर्व्हे, निधींची अडचण, प्रशासनाकडे लोकप्रतिनिधींनी लावलेला रेटा आदी कारणांमुळे ही लोकल सेवा रडतखडत सुरू करण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. खासदार सुुप्रिया सुळे यांनी याबाबाबत प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्याला समाधानकारक यश मिळाले. 2014 मध्ये केंद्रात सत्तांतर झाल्यानंतरही खासदार सुळे यांनी हा प्रश्‍न मार्गी लावला. या मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे -दौंड रेल्वे मार्गावर डेमूची चाचणी दि. 25 मार्च 2017 मध्ये पूर्ण करण्यात आली. त्यानंतर काही महिने डेमूचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. डेमू रूळावर येण्यासाठी पुन्हा अडचणींच्या बाधा झाली. डेमू पूर्ण क्षमतेने रुळावर येण्यासाठी प्लॅटफॉर्मची उंची पुरेशी नव्हती. त्यामुळे डेमूसाठी पुन्हा प्लॅटफॉर्मचा प्रश्‍न आ वासून उभा राहिला. ही डेमू बारामतीपर्यंत सुरू करण्यात आली. वेळापत्रक कोलमडून पडले असताना त्यात डेमूतील तांत्रिक दोषाचा धूर निघू लागला. आतापर्यंत तीनवेळा डेमू पेटली. या अनेक समस्यांमधून मार्ग काढीत डेमू धिम्या गतीने धावत आहे. या मार्गावर ओव्हर ब्रीजचे काम सुरू करण्यासाठी प्रशासन पातळीवर प्रयत्न करण्यात आले.

लोकलला गती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मांजरी, कडेठाण, खुटबाव येथील प्लॅटफॉर्मच्या कामांसाठी सुमारे सहा कोटींचा निधी देण्यात आला. त्यानंतर पुन्हा तांत्रिक “बाधा’ निर्माण झाली होती. या स्थितीतही रेल्वे प्रशासनाकडून प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पुणे विभागातील डीएमआर देऊस्कर, डेप्युटी सिनिअर डिव्हिजन इंजिनिअर समन्वयक सुरेश पाखरे यांनी या कामासाठी गती दिली. त्यामुळे हे काम आता मार्गी लागत आहे.

खुटबाव येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून रेल्वे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. कडेठाण येथील प्लॅटफॉर्मचे काम 30 दिवसांत पूर्ण होणार आहे. हे काम जानेवारी महिन्यांत काम पूर्ण होणार आहे. मांजरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे काम मार्चअखरेपर्यंत पूर्ण होणार आहे. मांजरीत एका बाजूने 200 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मार्चनंतरच डेमू धावणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठपुरावा 

पुणे शहराचा विस्तारित भाग म्हणून दौंड तालुक्‍याकडे पाहिले जात आहे. त्यात पुणे शहरात दरररोज नोकरी, व्यापार, शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी आदी प्रवाशांची संख्या सुमारे सात हजारांवर आहे. गेल्या 20 वर्षांपासून पुणे- दौंड लोकलची मागणी होत आहे. त्यात ही मागणी निधींमध्ये अडकली होती. परंतु यातून तोडगा काढत हे काम मार्गी लागत आहे. प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. मांजरी, कडेठाण, खुटबाव, पाटस येथील स्थानकातील पादचारी पुलाचे काम अद्याप बाकी आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रीपदाची धुरा बदल्यानंतरही खासदार सुळे यांनी सातत्य ठेवले आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून लोकलची मागणी प्रत्यक्षात आकारला येणार आहे.

पुणे ते दौंड विद्युतीकरण काम पूर्ण होऊन जवळपास 3 वर्ष उलटून गेली आहेत. परंतु अद्याप लोकल सेवा सुरू झाली नाही. कोट्यवधी रुपये खर्चून आम आदमी या सोयीपासून वंचित आहेत. तसेच उपनगरीय सेवा त्वरित सुरु करण्यात याव्यात आणि दौंड हे पुण्याचे उपनगर म्हणून त्वरित घोषित करण्यात यावे, अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. राज्यातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन ही मागणी येत्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मंजूर करून घ्यावी.
– विकास देशपांडे, सचिव. रेल यात्री संघ, महाराष्ट्र राज्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)