मार्चअखेरीस चार दिवस बॅंका बंद

मुंबई- आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता फार कमी दिवस शिल्लक आहेत. कर्ज परतफेड, विम्याचा हप्ता किंवा कराशी संबंधित काही कागदपत्रांसाठी बॅंकेची मदत लागू शकते. मात्र 29 मार्च ते 1 एप्रिल हे चार दिवस बॅंकांना सुट्या आहेत.

त्यामुळे आताचा ग्राहकांनाही कामे उरकून घ्यावी लागणार आहेत. 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला इअर एन्डिंग आणि 1 एप्रिलला रविवार आहे. या सलग आलेल्या सुट्यांबाबत अनेक बॅंकांनी आपल्या ग्राहकांना सूचना दिल्या आहेत. अर्थक्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी मार्च हा सगळ्यात खडतर महिना असतो. आर्थिक वर्षाचा लेखाजोखा, मांडताना, सगळे हिशेब जुळवावे लागतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)