मार्केट यार्ड येथून 20 हजाराची मोटारसायकल चोरीस

नगर – कोतवाली पोलीस ठाण्याच्या हददीतील मार्केट यार्ड येथे मोटारसायकल चोरल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील वाहन चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अफजल हमीद खान (रा.शेरकर गल्ली,माळीवाडा,अ.नगर ) यांच्या मालकिची 20 हजार रूपये किंमतीची होंडा शाईन कंपनीची एमएम.16 ए झेड 1570 या क्रमांकांची मोटारसायकल मार्केट यार्ड येथील मर्चन्ट बॅंकेसमोर लावलेली असतांना अज्ञात चोराने मोटारसायकलचे हॅन्डल लॉक तोडून मोटारसायकल चोरल्याप्रकरणी अज्ञात चोराविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)