मार्केट यार्डात हंगामातील उच्चांकी आवक

भेंडी, गवार, दोडका, दुधी भोपळा, कारली, वांगी, पावटा आणि मटारच्या भावात घसरण


उर्वरित सर्व फळभाज्या स्थिर

पुणे – गुरूवारी मराठा आंदोलकांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद, शनिवारची साप्ताहिक सुट्टी, त्यातच पुणे विभागात अनेक ठिकाणी पाऊसने घेतलेल्या उघडीपमुळे रविवारी मार्केट यार्डात फळभाज्याची हंगामातील सर्वोच्च आवक झाली. त्यामुळे भेंडी, गवार, दोडका, दुधी भोपळा, कारली, वांगी, पावटा आणि मटारच्या भावात सुमारे दहा ते वीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तर, उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात तब्बल 225 ट्रक शेतमालाची आवक झाली. कर्नाटक आणि गुजरात येथून चार ते पाच ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथून 18 ते 20 टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 7 ते 8 टेम्पो शेवगा, मध्ये प्रदेश, इंदौर येथून 7 ते 8 टेम्पो गाजर, मध्यप्रदेश आणि गुजरात येथून मिळून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले 2200 पोती, टॉमेटो साडेपाच ते सहा पाच हजार पेटी, फ्लॉवर 18 ते 20 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, गवार 7 ते 8 टेम्पो, भेंडी 15 ते 16 टेम्पो, शेवगा 4 ते 5 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, हिरवी मिरची 7 ते 8 टेम्पो, मटार 5 ते 5.5 हजार गोणी, काकडी 10 ते 12 टेम्पो, कारली 10 ते 12 टेम्पो, पावटा 8 ते 10 टेम्पो, भुईमूग 150 पोती, कांद्याची 70 ते 80 ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून मिळून बटाट्याची 30 ते 35 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : 100-130, बटाटा : 130-180, लसूण : 150-300, आले : सातारी: 350-400, भेंडी : 150-250, गवार : गावरान : 300-400, सुरती : 250-350, टोमॅटो : 80-120, दोडका : 150-200, हिरवी मिरची : 200-300, दुधी भोपळा : 60-120, चवळी : 150-200, काकडी : 60-120, कारली : हिरवी 180-200, पांढरी : 140-150, पापडी : 180-200, पडवळ : 160-180, फ्लॉवर : 60-100, कोबी : 80-120, वांगी : 100-200, डिंगरी : 140-150, नवलकोल : 80-100, ढोबळी मिरची : 200-300, तोंडली : कळी 240-260, जाड : 100-120, शेवगा : 300-350, गाजर : 120-160, वालवर : 250-300, बीट : 100-120, घेवडा : 250-400, कोहळा : 100-150, आर्वी : 300-350, घोसावळे : 140-160, ढेमसे : 200-250, भुईमूग : 250-350, पावटा : 150-200, मटार : 220-260, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 240-250, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)