मागणी वाढल्याने मागील आठवड्याच्य तुलनेत भाव वधारले


तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव नाही


गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात मागणी, भाव वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

 

पुणे – लाल रंगाच्या, टपोरे दाणे असलेल्या डाळिंबाचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. मागील काही दिवसांपासून मार्केट यार्डातील फळ विभागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाची आवक होत आहे. रविवारी तर
तब्बल 400 टन इतकी आवक झाली आहे. या आठवड्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने
डाळिंबाच्या भावात सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तरीही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे.
े घाऊक बाजारात भगवा जातीच्या डाळिंबाला किलोला दर्जानुसार 25 ते 75 रुपये, आरक्ता आणि गणेश डाळिंबाला अनुक्रमे 10 ते 40 रुपये आणि 5 ते 25 रुपये भाव मिळत आहे. साधारणत: ऑगस्ट महिन्यापासून डाळिंबाचा हंगाम सुरू होतो. जिल्ह्यासह राज्यात गेल्या चार ते पाच वर्षांत डाळिंबाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला असून मागणीपेक्षा आवक जास्त होत आहे. परिणामी, भाव कमी मिळत आहे. सध्या जिल्ह्यातून इंदापूर, बारामती, पुरंदर, भागातून सोलापूर जिल्ह्यातून विशेषत: सांगोला, पंढरपूर भागातून, सातारा आणि नगर जिल्ह्यातून मार्केट यार्डात डाळिंबाची आवक होत आहे. रविवारी झालेल्या मोठ्या आवकेबाबत व्यापारी अभिजित मारणे म्हणाले की, बाजारात सर्वाधिक आवक नगर जिल्ह्यातून होत असून, तेथून दाखल होणारे डाळींब उच्च दर्जाचे आहे. तर इतर परिसरातून येणारे डाळींबाचा दर्जा थोडासा खालावलेला आहे. तर व्यापारी सिध्दार्थ खैरे म्हणाले, फळाला चव चांगली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मागणी कमी आहे. सध्या राज्यासह जम्मू-काश्‍मीर, आसाम तसेच उत्तर प्रदेश येथून
मागणी होत आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असल्याने येत्या काळात डाळिंबांना मागणी वाढून भाव काही प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)