मार्केट यार्डात गाळ्यात घुसली कार : तीन जखमी

पुणे – भरधाव वेगातील गाडीवरील मद्याधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट मार्केट यार्डातील फळ विभागातील गाळा क्रमांक 660-61 समोरील कट्टयावर घुसली. सोमवारी रात्री घडलेल्या या अपघातामुळे मार्केटयार्डमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, कारच्या धडकेत तीन व्यक्ती जखमी झाला असून, त्यां उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी नागरिकांची नावे कळू शकली नाहीत. उपस्थित नागरिकांनी त्यास उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस घटनास्थळी दाखल झाले तसेच त्यांनी चालकास ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे घटनास्थळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी उसळली होती. सोमवारी रात्री हा प्रकार घडला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)