मार्केट यार्डात आंबा महोत्सव

शेतकऱ्यांनाही थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देणार जागा

पुणे- पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मार्केट यार्डातील फळ विभागात येत्या बुधवारपासून (दि. 18 एप्रिल)आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जून अखेरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. यामध्ये थेट शेतकऱ्यांना विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बाजार समितीचे सचिव बी.जे.देशमुख यांनी सांगितले.
बाजारात हापूस, पायरीसह लालबाग, बदाम, तोतापुरी, पायरी, मलगोबा, विदर्भ आणि गुजरात केशर, लंगडा, चौसा, दशहरा अशा अनेक प्रकारच्या आंब्याची आवक होत असते. मात्र, नागरिकांना केवळ हापूस आणि पायरीबाबतच माहित आहे. उर्वरित सर्व आंब्याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. रत्नागिरीच्या नावावर कर्नाटक आंबा मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची फसवणूक होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे. ज्याला जो हवा, तो आंबा मिळणार आहे. महोत्सवाचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे. त्यावर फसवणूक झाल्यास तक्रार करण्यासाठी दुरध्वनी क्रमांक देण्यात येणार आहे. पेजवर दररोजचे आंब्याचे भाव दिले जाणार आहेत. जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार आहे. फळ बाजाराच्या पाकळ्यांमध्ये हा महोत्सव होणार आहे. महोत्सवात आडते तर विक्रीच करणार आहेत. शेतकऱ्यांना भाव मिळणे गरजेचे आहे. मागितल्यास शेतकऱ्यांना महोत्सवात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)