मार्केट यार्डातील 22 आडत्यांची दप्तरे ताब्यात

बाजार समिती प्रशासनाची कारवाई : सी.ए.मार्फत होणार तपासणी


दोषी आढळल्यास होणार दंडात्मक कारवाई

पुणे – मार्केट यार्डातील 22 आडत्यांची दप्तरे तपासणीसाठी बाजार समिती प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या आडत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी.जे.देशमुख यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली.

काही आडत्यांनी डाळिंब उत्पादक शेतकरी आणि खरेदीदारांची हमाली आणि लेव्हीच्या माध्यमातून कोट्यवधीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केटयार्डातील संशियित आडत्यांची दफ्तरे आणि शेतमालपट्ट्यांची तपासणी करण्याचा निर्णय समितीने असून, आडत्यांची दफ्तरे उचलण्यास सुरूवात केली आहे. दफ्तर तपासणीसाठी नेमलेल्या आठ ते दहा सीएंकडून रविवारपासून (दि.14) तपासणी सुरू करण्यात येणार आहे. त्याबरोबर दफ्तर उचलण्यासाठी 4 पथके तयार केली आहेत. सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे कांदा अनुदानाचे काम असल्यामुळे दफ्तर ताब्यात घेण्याच्या कारवाईत गती कमी आहे. मंगळवारनंतर (दि. 15 जानेवारी) कांदा अनुदानाचे काम संपणार आहे. त्यानंतर दफ्तरे ताब्यात घेण्याच्या कारवाईचा वेग वाढविला जाईल, असे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तिप्पट “सेस’ वसुली करणार
आडत्यांकडून ताब्यात घेतलेल्या दफ्तर तपासणीत “सेस’ बुडविल्याचे समोर आल्यास बाजार समितीस देणे लागणाऱ्या “सेस’च्या रकमेवर तिप्पट दंड, अनुषंगिक खर्च आणि कर वसूल करण्यात येणार आहे. त्याबरोबर या “सेस’ बुडवण्याच्या प्रकरणात समितीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्याचे समोर आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही बी. जे. देशमुख यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)