मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या तत्काळ काढा -पालकमंत्री गिरीश बापट यांचे बाजार समिती प्रशासनाला आदेश

पणनमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करा


कारवाईचा आढावा तीन दिवसांत द्या : अन्यथा मी नाराज होईन

 

पुणे – मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या तत्काळ काढून टाका. तीन दिवसांत केलेल्या कारवाईचा मला अहवाल द्या. असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी बाजार समिती प्रशासकीय मंडळ आणि सचिवांना दिले आहेत. हा अहवाल तीन दिवसांत द्या; अन्यथा मी नाराज होईन, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्या (शनिवार दि. 26) सकाळीच अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी त्यांना सांगितले.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार घटकांची आढावा बैठक बापट यांनी शुक्रवारी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे घेतली. सुमारे पाच तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी बाजार आवारातील 25 संघटनांची चर्चा केली. बैठकीस बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, संचालक मंडळ आणि सचिव बी. जे. देशमुख, मनपा, पणन, एफडीएचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्ये, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, वाहतूक कोंडी याविषयी असलेल्या समस्यांचा पाढाच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यासमोर वाचला. त्यावेळी प्रयत्न, चर्चा करून सर्व प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन बापट यांनी दिले आहे.
दरम्यान, मार्केट यार्डात अनधिकृत टपऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: भाजपप्रणित प्रशासकीय मंडळाच्या काळात ही संख्या वाढली आहे. बाजार आवारातील संघटनांनी तक्रार केल्यानंतर दस्तुरखुद्द सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजार समिती प्रशासनाला मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या काढण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला बाजार समिती प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. अद्याप अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याचे बापट यांच्या यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी सार्वजनिक जीवनात ठोस निर्णय घ्यावेच लागतात. पणन मंत्र्याच्या आदेशांचे पालन करा, मार्केट यार्डातील तत्काळ टपऱ्या काढून टाका, अशा सूचना पालकमंत्र्यानी बाजर समिती प्रशासनाला दिल्या. एवढे बोलून ते गप्प बसले नाहीत. त्यांनी तीन दिवसांत याबाबतचा आढावा द्या, असे सांगितले. त्यावेळी शनिवारी सकाळपासूनच मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. त्यामुळे उद्या मार्केट यार्डातील टपऱ्यावर कारवाई केली जाणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)