मार्केटयार्ड ठप्प!

पणन कायद्यातील सुधारणांविरोधात बंद


आडते, व्यापारी आणि कामगारांचाही सहभाग

पुणे – राज्य सरकारने पणन कायद्यात केलेल्या सुधारणा आणि बाजार समितीच्या मर्यादित कार्यक्षेत्राविरोधात मार्केटयार्डातील आडते, व्यापारी आणि कामगारांनी मंगळवारी कडकडीत बंद पाळला. या संपाची शेतकऱ्यांना पूर्वकल्पना दिल्याने शेतीमाल फारसा आला नाही. त्यामुळे बाजारात कोणेतही व्यवहार झाले नाहीत. या बंदमुळे पुणे शहर आणि उपनगरांमधील भाजीपाला व फळांचा पुरवठा विस्कळीत झाला होता.

बाजार समिती आवारात व्यापार करणाऱ्यांना भरावा लागणारा “सेस’, राष्ट्रीय कृषी बाजार व ई-नाममध्ये व्यापारासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या विविध तरतुदी तसेच माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यांविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन, दि पूना मर्चंटस्‌ चेंबर आणि कामगार युनियनने मंगळवारी मार्केटयार्ड बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार व्यापारी, आडते, कामगारांनी हा बंद पाळला. यामुळे फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, पान आणि केळी विभागासह गुळ-भुसार बाजारातील कामकाज दिवसभरासाठी ठप्प झाले होते.
बंदच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात राज्यासह परराज्यातून अवघी 46 शेतीमालाची ट्रक आवक झाली.

फळभाज्यांची 3 वाहने, कांदा-बटाटा, आले व लसूणाची 17 तर फळांची 26 अशा प्रकारे 46 वाहने बाजारात दाखल झाली होती. याद्वारे जवळपास 4 हजार 51 क्विंटल मालाची बाजारात आवक झाली होती. एरवी 755 वाहनांमधून 32 हजार 107 क्विंटल माल बाजारात दाखल होतो. मात्र, मंगळवारी बहुतांश शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस पाठविला नाही. तर, ज्यांनी शेतमाल पाठविला, त्यांचे व्यवहार न झाल्याने ती वाहने तशीच उभी आहेत. त्यातील माल काढणे आणि मालाची विक्री बुधवारी होणार असल्याची माहिती विभागप्रमुख बाबा बिबवे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)