मार्केटयार्डात फुलांचा दरवळ

आवक आणि मागणीही वाढली

पुणे – नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मार्केटयार्डातील घाऊक फुलबाजारात फुलांची मोठी आवक झाली असून त्या तुलनेत फुलांना मागणी वाढली आहे. विशेषत: झेंडूची आवक जास्त झाली आहे.

-Ads-

येथील बाजारात जिल्हासह सोलापूर, सातारा, उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठी आवक झाली आहे. यावर्षी श्रावण महिना तसेच गणेशोत्सवात फुलांना विशेष मागणी राहिली. यंदा अधिक मास आल्याने झेंडू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे लागवडीचे वेळापत्रक चुकले. गणेशोत्सवात झेंडुची आवक चांगली झाल्याने बाजारात मुबलक झेंडू विक्रीसाठी उपलब्ध होता. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही.

नवरात्रोत्सवात हार विक्रेते तसेच तोरण विक्रेत्यांकडून फुलांना मोठी मागणी असते. बाजारात झेंडूची आवक वाढली आहे. घटस्थापनेसाठी लागणारे पूजा साहित्य तसेच फुले खरेदीसाठी मंगळवारी महात्मा फुले मंडई, बाबू गेनू चौक परिसरात गर्दी झाली होती. घटस्थापनेसाठी लागणारी माती तसेच फुले खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली.

मार्केट यार्डात 27 हजार 385 किलो झेंडूची आवक
श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फूल बाजारात मंगळवारी 27 हजार 385 किलो झेंडूची आवक झाली. गुलछडी 6 हजार 419 किलो, गुलाब 7 हजार 471 गड्डी, जरबेरा 4 हजार 322 किलो अशी आवक बाजारात झाली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजाराचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.

पितृ पंधरवड्यामुळे फूल बाजारातील उलाढाल थंडावली होती. कमी प्रमाणात फुलांची आवक होती. त्यासही फारशी मागणी नाव्हती. आता नवरात्रोत्सवात फुलांच्या मागणीत वाढ झाली असून आवकही वाढली आहे.
– सागर भोसले, फुल विक्रेते.

असे आहेत फुलांचे भाव
घाऊक बाजारात प्रति किलोस झेंडूला – 20 ते 30 रुपये, गुलछडी-80 ते 150 रुपये, बिजली-20 ते 80 रुपये, शेवंती-100 ते 150 रुपये, गुलाब गड्डीस 20 ते 40 रुपये याप्रमाणे भाव मिळत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)