मार्केटयार्डात पुन्हा नियमावलीचे उल्लंघन

‘जैसे थे’ परिस्थिती : बाजार घटकांकडून वाहतूक कोंडी

पुणे – मार्केट यार्डातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाजार समितीने नवीन नियमावली तयार करून काही दिवस अंमलबजावणी केली. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. गाळ्यांसमोर आणि रस्त्यावर शेतमालाची वाहने थाटून विक्री केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून बाजारात येणाऱ्यांना त्रास होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने फळे, तरकारी, फुलबाजार, भुसार विभाग या विभागातील सर्व घटकांची सुकाणू समिती तयार करून नविन नियमांची नियमावली केली. सुरूवातीला या नियमावलीची अंमलबजावणी कडक करण्यासाठी दंडात्मक कारवाईही सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून ही नियमावली फक्त कागदावरच राहिली आहे. बाजार समितीने कारवाई सुरू केल्यानंतर सुरूवातीच्या काही दिवसांत कारवाई जोरदार सुरू होती. त्यामुळे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न काहीसा मिटला होता. सर्वजण नियमांचे पालन करत असल्यामुळे आवाराला शिस्त लागली होती. आता कारवाईचा वेग मंदावला असून नियमांचे उल्लंघन करीत गाळ्यांसमोर पंधरा फुटाबाहेर शेतमालाची विक्री सुरू आहे. रविवारी दुपारनंतरही शेतमालाची रिकामी वाहने मार्केटयार्ड आवारातच उभी होती.

नवीन नियमानुसार मार्केटयार्डातील फळविभागात दुपारी 2 वाजेपर्यंत शेतमालाची घाऊक विक्री करण्याचे बंधन असतानाही दुपारनंतरही खुलेआम किरकोळ विक्री सुरू आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर दुतर्फा किरकोळ विक्री सुरूच आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या खरेदीदार, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून हमालांना तर शेतमाल ने-आण करणे जिकिरीचे होत आहे. मात्र, याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. तरकारी विभागात गेल्या अनेक वर्षांपासून लिंबू विक्रेते बाजारात मिळेल त्या जागेवर अनधिकृतपणे विक्री करत आहे. आडत्यांच्या गाळ्यासमोरच लिंबू विक्रीचा ठाण मांडत असल्याने आडत्यांच्या शेतमाल विक्रीवरही परिणाम होत आहे. हे विक्रेते वाहतूक कोंडीस अडथळा ठरत आहेत. या विक्रेत्यांवर तर बाजार समिती कारवाई करणार का, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)