मार्केटयार्डातील प्रस्तावित रस्ता रद्द करावा – दि पूना मर्चंट्‌स चेंबरची मागणी

पुणे- मार्केटयार्डात डीपी रस्ता प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे. हा रस्ता रद्द करावा, अशी मागणी दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी केली आहे. हा रस्ता रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी माजी अध्यक्ष वालचंद संचेती, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रविण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सहसचिव विजय मुथा आदी उपस्थित होते.
ओस्तवाल म्हणाले, मार्केटयार्डातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांना व्यापार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 1975 मध्ये नाना पेठ, भवानी पेठ आणि गणेश पेठेतून बाजार स्थलांतरीत करून मार्केटयार्डात सुरू करण्यात आला. त्यावेळी मार्केटयार्डची दुरवस्था होती. व्यापार वाढावा याकरिता बाजार समितीने
व्यापाऱ्यांना मार्केटयार्डमध्ये व्यापार करण्याची विनंती केली. सद्यस्थितीत मार्केटयार्डात 500 दुकाने आहेत. त्यातील बाजाराशी पुरक आणि अनुषंगिक 100 व्यापाऱ्यांचे परवाने नुतनीकरण केले जात नाहीत. या परवान्यांचे परवाने तत्काळ नुतनीकरण करावे. अन्यथा बाजार समितीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशाराही त्यांनी दिला. राजेंद्र बाठीया म्हणाले, मार्केट यार्डाच्या बाहेर व्यापार करणाऱ्यांना सेस अथवा कोणताही चार्ज नाही. त्याप्रमाणे मार्केट यार्डातील व्यापारही खुला करावा. बाजार समितीने केवळ मार्केटयार्डात व्यापार करणाऱ्या मेंटनन्स खर्च घ्यावा. इतर खर्च घेवू नये. तसेच व्यापारासाठी घेण्यात येणाऱ्या परवान्याची मुदत ही पाच वर्षांची असावी; तर वालचंद संचेती म्हणाले, ऑनलाईनचा जमाना आहे. आता सर्वत्र परवान्याचे नूतनीकरण ऑनलाईन होते. त्याप्रमाणे बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या परवान्याचे ऑनलाईन नूतनीकरण करावे.
…………..
ठोस पर्याय मिळाल्याशिवाय प्लॅस्टिक बंदी करू नये
पूर्वी वर्तमानपत्रांच्या कागदपत्रांमध्ये किराणा पुड्या बांधून दिल्या जायच्या. आता प्लॅस्टिक पिशव्यातून देण्यात येत आहे. छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना प्लॅस्टिकची गरज आहे. राज्य सरकारने नुकतीच प्लॅस्टिक बंदी केली आहे. पर्याय उपलब्ध न करता एकतर्फी प्लॅस्टिकवर बंदी आणल्याने व्यापारी अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारने प्लॅस्टिकला नवीव पर्याय उपलब्ध करून देईपर्यंत प्लॅस्टिकवर बंदी आणू नये, अशी मागणी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी यावेळी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)