मार्केटमध्ये राजस्थानातून गाजराची आवक

पुणे – दिवाळी सणानिमित्त दरवर्षी खास हलव्यासाठी घरगुती ग्राहकांकडून गाजराची मागणी वाढते. या पार्श्‍वभूमीवर शहरातील गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात राजस्थान येथून गाजरांची बाजारात आवक सुरू झाली आहे. याचा दर प्रति 10 किलोला 300 ते 320 रुपये इतका आहे.

दरवर्षी मार्केटयार्डातील तरकारी विभागात स्थानिक भागासह इंदौर आणि राजस्थान येथून गाजरांची बाजारात आवक होत असते. साधारणत: एक महिन्यापुर्वी इंदौर येथील गाजरांचा हंगाम संपला असून राजस्थान येथील हंगामातील पहिली आवक जोधपूर येथून सुरू झाली आहे. रविवारी मार्केटयार्डातील तरकारी विभागात राजस्थान येथून 13 टन मालाची आवक झाली. त्यास प्रति गोडीही अधिक आहे. यामुळे नागरिक याला पसंती देतात. राजस्थानी गाजरे हे काढणी केल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणले जातात. त्यामुळे ग्राहकांना वर्षभर उपलब्ध असतात. राजस्थानच्या गाजरांची चव गोड असते. त्यामुळे मागणीही अधिक असते. ही गाजरे गोवा, सांगली, कोल्हापूर तसेच बेळगाव परिसरात पाठविण्यात येतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)