मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅलीत गौरव गिलची बाजी

पुणे: सहा वर्षापूर्वी आपले पहिले जेतेपद मिळवणाऱ्या गौरव गिलने यंदाच्या मारुती सुझुकी दक्षिण डेअर स्पर्धेत पुन्हा एकदा चमक दाखवताना विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचा नेव्हिगेटर मुसा शेरीफसह त्याने सहा एपीआरसी आणि महिंद्रा ऍडव्हेंचर रेसमध्ये छाप पाडली. नंतर या जोडीने 15 विशेष स्तरातदेखील आपली छाप पाडली. बाईक गटात विनय प्रसादने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

रॅलीतील शेवटच्या विशेष स्तरातील एसएस 12 मध्ये युवा कुमार पिछाडीवर पडल्याने विनय प्रसादने आघाडी घेतली. युवा या गटात सुरुवातीला आघाडीवर होता. अखेरचे 15 कि.मी. शिल्लक असताना त्याच्या बाईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे त्याला 15 मिनिटांचा फटका बसला व जेतेपद गमवावे लागले. गिलचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (पीव्हीएस मूर्ती) यांनी दुसरे स्थान मिळवले तर,मारुती सुझुकीच्या सम्राट यादवने करण उकतासह तिसरे स्थान पटकावले.

गिल व मुसा या जोडीने दक्षिण डेअर स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्यांची एकत्रितपणे 50 रॅलींमध्ये भाग घेतला असून त्यापैकी 31 रॅलीमध्ये विजय मिळवला आहे. यापैकी 35 वेळा त्यांनी किमान एक पदक पटकावले असून त्यापैकी 15 वेळा ते तांत्रिक बिघाडामुळे त्यांची संधी हुकली. परंतु यंदाच्या वर्षी

रॅलीसाठी मी आपला हाच उत्साह कायम ठेवला आहे.ड्राईव्हच्या वेळी आम्ही 200 टक्‍के योगदान देत असतो, असे सांगून विजेतेपदाचा करंडक स्वीकारताना गिल म्हणाला की, आम्ही संघ म्हणून गेल्या पाच दिवसांत चमक दाखवली.
गिलने 06:57:44 वेळेसह पाच स्तर पूर्ण केले व इतरांपेक्षा किमान 15 मिनिटांच्या फरकाने बाजी मारली. रॅलीच्या लांब अंतरासाठी त्याने सर्वोत्तम 01:15:50 मिनिटे वेळ नोंदवली. टीम मारुती सुझुकीने सर्वच विभागात चमक दाखवली. संदीप शर्मा आणि सुरेश राणा यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळवले.

सविस्तर निकाल-
कार – 1) गौरव गिल व मुसा शरीफ (6:57:44), 2) फिलिपोस मथाईस पीव्हीएस मूर्ती (7:12:00), 3) सम्राट यादव – करण उकटा (7:21:10,
बाईक – 1) विनय प्रसाद (6:10:07), 2) विश्वास एस. डी. (6:10:09), 3) युवा कुमार (6:13:49),
एमएसडीडी कार ओपन – 1) प्रमोद विगव प्रकाश एम., 2) रघुनंदन व साकेतेवेल, 3) संतोष व नागा,
एमएसडीडी एसयूव्ही ओपन – 1) विनय कुमार व रवी कुमार,
एएसडीडी डे-कार – ओई- 1) श्रीकांतव रघुरामन, 2) नंदिता रेड्डी व संजना रेड्डी,
एएसडीडी डे-एसयूव्ही -ओई- 1) फिलिप बकलीनव डेव्हिड शेरॉन, 2) दीपक सचदेवा व जपज्योत सिंग,
एमएसडीडी डे कपल- 1) कॅप्टन अभिलाषा सिंग व शैलेंद्र सिंग, 2) अनिल अब्बास व सिनी अनिल, 3) स्निग्धा केमकर व भालचंद्र
एमएसडीडी डे लेडीज- 1) गीता वाधवा व प्रतिभा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)