मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅली: सम्राट यादव तिसऱ्या स्थानी, गिलची आघाडी कायम

पुणे: मारुती सुझुकीच्या सम्राट यादवने दोन स्थानांच्या फायद्यासह मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅलीमध्ये तिसरे स्थान मिळवले. तर पाच वेळचा आयएनआरसी चॅम्पियन गौरव गिलने चमकदार कामगिरीसह आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. अनेक अडथळ्यांच्या मार्गामध्ये सम्राटने आपली चमक दाखवली व दिवसाची तीन विशेष स्तरातील (41.14 मिनिटे) सर्वोत्तम वेळ नोंदवली.

कर्नाटकमधील देवांगेरे येथे सुरू असलेल्या या रॅलीत गौरव गिल (सहचालक मुसा शेरीफसह) आणि फिलिपोस मथाई (पीव्हीएस मूर्ती) यांनी सुरुवातीचे दोन स्थान काबीज केले आहे. त्यामुळे आता सर्व नजरा या मारुतीच्या संदीप शर्मा (अनमोल रामपालसह) आणि महिंद्रा ऍडव्हेंचरच्या अमित्रजित घोष ( अश्‍विन नाईकसह) यांच्याकडे असणार आहेत.
सम्राट खऱ्या अर्थाने चमक दाखवली.त्याने पहिल्या दिवशी विशेष गटात (एसएस12) 00:14:57 अशी वेळ नोंदवली.ही गिलच्या 00:15:21 वेळेपेक्षाही चांगली कामगिरी होती. दुस-या स्थानी असलेल्या फिलिपोसपेक्षाही तो दोन विशेष गटात जलद होता.त्यामुळे रॅलीच्या फायनल लेगमध्ये त्याचा आत्मविश्‍वास दुणावेल. या रॅलीचा शेवट शुक्रवारी रात्री उशिरा गोवा येथे होणार आहे.

संदीप व अमित्रजित यांमध्ये चांगली चुरस पहायला मिळवला. तिस-या व शेवटच्या स्तराच्या तीन किमी आधी फ्युएल कपलरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. संदीपला गेल्या दोन दिवसांप्रमाणे चमक दाखवता आली नाही. त्याने 6:05:37 मिनिटांच्या वेळेसह चौथे स्थान मिळवले. बाईक गटात युवा कुमार व आकाश ऐतल यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळवले. तर विनय प्रसादने तिसरे स्थान पटकावले.

सविस्तर निकाल– कार – 1) गौरव गिल व मुसा शेरीफ 05:41:54 2) फिलिपोस मथाई आणि पीव्हीएस मूर्ती 05:52:06 3) सम्राट यादव आणि करण औकटा 06:02:25,
बाईक – 1) युवा कुमार 04:19: 28 2) आकाश ऐतल 04:24:28 3) विनय प्रसाद 04:30:29.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)