मारुतीच्या 640 गाड्यांमध्ये खराबी 

नवी दिल्ली: भारतातील एक मोठ्या प्रमाणात कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी ओळखली जाणारी कार कंपनी म्हणजे मारुती सुझुकी होय. या कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये काही बिघाड असल्याची माहिती कंपनीला मिळाल्याने ते जवळपास 640 गाड्या परत मागविण्यात येत असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
भारतात उत्पादित करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये फ्युअल पम्पस्‌मध्ये बिघाड असल्याने त्या परत मागवण्यात येत आहेत. यात 20 जानेवारी 2018 ते 14 जुलै 2018 या कालावधीत तयार करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये बिघाड असल्याचे निर्देशनास आल्याचे कार निर्मितीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बिघाड असलेली वाहने 3 ऑक्‍टोबरपासून परत मागवण्यात येणार आहेत. याकरिता ग्राहकांनी आपल्या जवळ असणाऱ्या मारुती सुझुकीच्या शोरूमला संपर्क करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. यासाठी ग्राहकांच्या सेवेकरिता केंद्र सुरू करून संबंधित बिघाड दुरुस्त करणार असल्याचे कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. या अगोदर 2017-2018 मध्ये कंपनीने 10 हजार युनिट्‌सची विक्री केली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)