आधी एक कोटी भरा मग जामीनासाठी या
मुंबई – कोट्यवधी रुपयाच्या आर्थिक फसवणूकीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मारिया सुसाईराज हिला उच्च न्यायालयाने तूर्त अटकपूर्व जामीन देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. आधी एक कोटी जमा करा, मग जामिनावर विचार केला जाईल असे उच्च न्यायालयाचे सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी स्पष्ट करून अर्जाची पुढील सुनावणी 15 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे तिला केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे. अनेक व्यावसायीकांना खोटी आश्‍वासने देऊन सुमारे 15 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी मारिया सुसाईराजसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांच्या हातात बेड्या ठोकल्याने अटकेची शक्‍यता निर्माण झाल्याने मारिया सुसाईराजने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्या. अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आधी एक कोटी रूपये जमा करा, त्यानंतर जामिनावर विचार केला जाईल, असे स्पष्ट करून अर्जाची सुनावणी 15 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)