मारामारी प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा

कराड, दि. 29 (प्रतिनिधी) -आगाशिवनगर-मलकापूर (ता. कराड) येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीप्रकरणी दाखल झालेल्या परस्परविरोधी फिर्यादींवरून शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रवीण बाजीराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रताप अशोकराव माने, महेश अशोक माने, रोहन अशोक माने, सचिन, व अन्य अनोळखी तिघे (सर्व रा. ढेबेवाडी रोड, कराड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रताप माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण जगताप व बाजीराव जगताप (दोघेही रा. मलकापूर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)