मारामारी,जबरी चोरी करणारी टोळी हद्दपार

सातारासातारा शहर परिसरात मारामारी व जबरी चोरी करणाऱ्या तिघांना पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी एक वर्षासाठी तडीपार केले.

शहरातील विविध भागात मारामाऱ्या,जबरी चोऱ्या यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुदर्शन उर्फ बल्ल्या राजू गायकवाड , सागर बापू सुर्यवंशी , सलीम सल्ल्या जैनुद्दीन शेख यांना तडीपार केले आहे.संशयित टोळी शहर पोलिस ठाणे व शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मारामारी व जबरी चोरी करत होती. संशयितांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना अटक करुन वेळोवेळी पोलिसांनी सुधारण्याची संधी दिली. मात्र त्यांच्या वागण्यात सुधारणा होत नव्हती. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. तसेच शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रमुखांकडे पाठवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर सुनावणी झाल्यानंतर वरील तिघांना सातारा जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)