मारहाण प्रकरणातील दोघांना एक वर्षाची सक्तमजुरी

वडूज, दि. 11 (प्रतिनिधी) – यलमरवाडी, ता. खटाव येथील मारहाण केल्याप्रकरणी किसन दाजी शिंगाडे व राहुल विष्णू शिंगाडे या दोघांना एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एन. पाठक यांनी ठोठावली. तसेच इतर दोन आरोपी सुखदेव काशिनाथ शिंगाडे व तानाजी महादेव शिंगाडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
याबाबतची घटना अशी की, दि. 3 ऑक्‍टोबर 2014 रोजी यलमरवाडी (ता. खटाव) येथील जितेंद्र दाजीराम गलंडे यास पूर्वी झालेल्या तक्रारीवरून चिडून धारधार हत्याराने गंभीर मारहाण केली होती. याबाबतची तक्रार जितेंद्र गलंडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली होती. त्याबाबतचा मारहाणीचा गुन्हा नोंद केला होता.
या खटल्यात अभियोग पक्षातर्फे आर. व्ही. साळुंखे व एन. डी. वाघमारे, सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांनी साक्षीदार तपासून आरोपीस कडक व जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यातील साक्षीदारांची साक्ष, सरकारी अभियोक्‍त्यांचा युक्तिवाद व पुरावा ग्राह्य मानून आरोपी किसन दाजी शिंगाडे व राहुल विष्णू शिंगाडे या दोघांना कलमानव्ये न्यायालयाने दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सदरकामी अभियोग पक्षास पोलीस प्रॉसिक्‍यूशन स्कॉड चे तौसिफ शेख, सहा. फौ. शिवाजी पायमल, प्रदीप गोसावी, सुधीर मोहिते, पो. हवा. विलास हांगे यांनी सहकार्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)