मारहाण प्रकरणातील आरोपी जेरबंद

पिंपरी – भोसरी पोलीस ठाणे हद्दीत मारहाण करुन फरार झालेल्या दोघा आरोपींना पिंपरीतील मोरवाडी येथून अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोरवाडी स्मशानभूमीजवळ केली.

संजय सुभाष करडे (वय-26) आणि विकास ख्वाजा बोटे (वय-20, दोघे रा. इंदिरानगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस हवालदार हजरत पठाण यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी मोरवाडी स्मशानभूमी येथे थांबले आहेत. यावर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संजय आणि विकास या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे समजले. त्यावरून त्या दोघांना अटक करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)