मारहाण, तोडफोडप्रकरणी चौघांना अटक

पिंपरी – पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्‍याने घरात घुसून तलवारी नाचवत घरातील साहित्य तसेच घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

सागर भरत बोरगे (वय-28, रा. बोरगेवाडा, पुनावळे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर शिवाजी लिमकर (वय-26, रा. बौद्ध विहार जवळ, ओव्हाळ वस्ती, पुनावळे), अमित दत्तात्रय पाटोळे (वय-19, रा. शिंदे वस्ती चौक, रावेत), योगेश संजय धुमाळ (वय-25, रा. पुनावळे गावठाण), सूरज उर्फ टिंकू राकेश मिश्रा (वय-20, रा. भुजबळ चौक, पुनावळे), तुकाराम (पूर्ण नाव मिळू शकले नाही) या चौघांना अटक करण्यात आली असून आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर यांचे पुनावळे येथे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी (दि. 21) रात्री सागर दुकानात असताना आरोपी सुधीर याने त्यांना उधार सिगारेट मागितली. त्यावर सागर यांनी उधार देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. सिगारेट दिली नसल्याने चिडलेल्या सुधीरने सागर यांना शिवीगाळ केली. त्याविरोधात सागर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर सोमवारी (दि. 22) रात्री बोरगे कुटुंबीय घरात झोपले असताना अचानक खिडकीची काच फुटल्याचा आवाज आला. सागर यांनी बाहेर डोकावून पहिले असता सुधीर त्याच्या मित्रांसह हातात तलवारी, कोयते घेऊन दरवाजावर लाथा मारत असल्याचे त्यांना दिसले. हे टोळके पाहून बोरगे कुटुंबीयांनी घरातील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. सुधीरने लाथा मारून हॉलचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत घरातील साहित्याची तोडफोड केली. यानंतर टोळक्‍याने घराबाहेर पार्क केलेल्या पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. सागर यांच्या घरातून साडेचार हजार रुपये असलेली पर्स देखील चोरून नेली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. आर. स्वामी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)