मारहाण करून जबरी चोरी करणारे जेरबंद

पुणे – शहर व ग्रामीण भागांत रात्रीच्या वेळी निर्जन परिसरात दुचाकीवरून आलेल्यांकडून नागरिकांना मारहाण करून लुटले जात होते. ही लुटमार करणाऱ्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल, 120 सीमकार्ड आणी चोरलेल्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

गणेश सुदर्शन शिंदे (23, रा. पाटस, ता. दौंण्ड), मारुती विष्णु पोळेकर (19, रा. पाटस, ता.दौंण्ड), सागर मारुती पवार (19, रा. पाटस, ता. दौंण्ड), नागेश रामा देवकर (रा.पाटस, ता. दौंण्ड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

लुटमारीचे गुन्हे वाढल्याचे लक्षात आल्याने गुन्हे शाखेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. दरम्यान, हडपसर पोलीस ठाऱ्याच्या हद्दीत फिर्यादी संदिप डवले (24, रा.आदिवासी मुलांचे वसतीगृह, हडपसर) याचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून चोरला. यावेळी त्याच्या डोक्‍यावर फरशीच्या तुकड्याने मारण्यात आले. या गुन्ह्याचा तपास करत असताना चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांची सखोल चौकशी केली असतान त्यांनी जबरी चोरीचे व वाहन चोरीचे गुन्हे कबूल केले. त्यांनी हडपसर, दत्तवाडी, लोणी काळभोर, यवत पोलीस स्टेशन, लष्कर पोलीस स्टेशन, दौंण्ड पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त मिलींद पाटील (वानवडी विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदिप देशमाने, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस कर्मचारी युसूफ पठाण, राजेश नवले, राजु वेगरे, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, नितीन मुंढे, दाऊद सय्यद, गोविंद चितळे, अकबर शेख, महिला पोलीस शिपाई रुपाली टेंगले यांच्या पथकाने केली.

जबरी चोरीचे गुन्हे निष्पन्न
अटक आरोपींनी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवासी व ट्रक ड्रायव्हर यांना देखील मारहाण करून त्यांच्याकडून रोख रक्‍कम व मोबाईल फोन जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोबाईल व सिमकार्ड यांच्या तांत्रिक विश्‍लेषणावरून मोठ्या प्रमाणात जबरी चोरीचे गुन्हे निष्पन्न झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)