मारहाण करुन सव्वा लाख लुटले

  • – संत तुकाराम नगर येथील घटना

पिंपरी (प्रतिनिधी) – विनाकारण मारहाण करून संतोष चांदेरे (वय 43, रा. खराळवाडी, पिंपरी) याच्याकडील 1 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम रविवार दि. 15 ला पहाटे पाचच्या सुमारास संत तुकाराम नगर येथून चोरून नेली.

सागर बसू चौधरी (वय 24, रा. नेहरूनगर, पिंपरी, पुणे) आणि विनम्र अहिवळे (वय 37, रा. उद्यमनगर, पिंपरी, पुणे) यांच्याविरुद्ध त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दूध विक्री टेम्पोवर संतोष काम करतात. रविवारी पहाटे संत तुकारामनगर येथे दूध पोहोचवण्यासाठी आले असता सागर आणि विनम्र चार चाकीमधून आले. दोघेही संतोष यांच्या परिचयाचे आहेत.

-Ads-

कोणतेही कारण नसताना दोघांनी संतोष यांना मारहाण करताना डोक्‍यात कठीण वस्तू मारली. यामध्ये संतोष गंभीर जखमी झाले. त्यांच्या खिशात दूध विक्रीचे 1 लाख 20 हजार रुपये होते. दोघांनी सर्व रक्कम जबरदस्तीने काढून तिथून पळ काढला. पिंपरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक मधुसूदन घुगे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)