मारहाण करीत लुटणाऱ्यास अटक

पिंपरी – पायी जाणाऱ्या तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून व मारहाण करून लुटणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे.

सोहेल इस्माईल शेख (वय 19, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सुमेन महेरा करेजी (वय 22 रा. लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेन हे पायी चालत जात असताना त्यांना शेख हा दुचाकीवरून आला व त्याने चाकूने व लाकडी बांबूने मारहाण करीत सुमेन यांच्याकडील पाकीट व त्यातील पाचशे रुपये व कागदपत्रे चोरीला गेले. सुमेन यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.27) तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)