मारहाण करत दोघांनी केली हॉटेलची तोडफोड

पिंपरी – चहाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी हॉटेल चालकाला मारहाण करत हॉटेलातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना देहूरोडमधील आंबेडकरनगरमध्ये घडली.

विकी शंकर (वय-20) आणि दीपक पांडे (दोघे रा. गांधीनगर, देहूरोड) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुनील जगन्नाथ बोरसे (वय-40, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सुनील आणि त्याचा भाऊ अनिल हे दोघे हॉटेलवर होते. यावेळी आरोपी दारू पिऊन तेथे आले. स्वत:च्या हाताने चहा आणि बिस्कीट घेऊ लागले. सुनील यांनी त्यांना समजावून सांगितले असता पैसे मागितल्याच्या कारणावरून अनिल यांना मारहाण करत हॉटेलातील साहित्याची तोडफोड केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)