बिबवेवाडी पोलिसांची कारवाई : न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे- पूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून लाकडी दांडक्‍याने आणि लोखंडी गजाने मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणात आणखी एकाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी.पाटील यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
गणेश कैलास हदगे (वय 20, रा. सुपर इंदिरानगर बिबवेवाडी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी ओंकार विनोद पवार (वय 19, रा. सुपर इंदिरानगर), अक्षय ऊर्फ ऍक्की सुभाष मंगलकर (वय 20) आणि अनिकेत महेंद्र माने (वय 19, दोघेही, रा. पवननगर, बिबवेवाडी) तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर किरण खवळे, सौरभ भगत आणि आनंद डोळसे या तिघांवर गुन्हा दाखल आहे. त्या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबाबत 16 वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. ही घटना 2 जुलै रोजी रात्री 9 च्या सुमारास अप्पर 276 ओटा, बिबवेवाडी येथे घडली. पूर्वी गणेश आणि फिर्यादीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला लाकडी लांडक्‍याने आणि लोखंडी गजाने मारहाण करत त्याच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेनची जबरी चोरी केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गणेश याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यात वापरलेले गज आणि जबरी चोरी केलेले सोन्याची चेन जप्त करण्यासाठी आणि फरार साथीदारांच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील अनंत चौधरी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने गणेश याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)