मारहाणीमुळे गर्भपात

पिंपरी – रंग काळा आहे म्हणून तसेच चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने तिचा गर्भपात झाल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काळी आहेस म्हणून टोमणे, चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण आणि माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून दबाव टाकणाऱ्या पती आणि सासरकडच्या नातेवाईकांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली असून पती निलेश संगम, सासू विमल संगम, सरीता संगम, बलराज संगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये महिलेचा आरोपी निलेश याच्याशी विवाह झाला होता. मात्र त्यानंतर पती व सासरच्या मंडळींनी तू काळी आहेस म्हणून टोमणे मारण्यास सुरुवात केली. तसेच चुलत सासरे बलराज याने पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. यावेळी पतीनेही मारहाण करत माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली. यावेळी फिर्यादीचे स्त्रीधन ही त्यांच्याकडून घेण्यात आले. फिर्यादी या गर्भवती असतानाही त्यांना 20 जून रोजी मारहाण केली. या मारहाणीमुळे 26 जून रोजी त्यांचा गर्भपात झाला. हा त्रास असह्य झाल्यानंतर त्यांनी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)