मारहाणीच्या निषेधार्थ आज कृषी संघटनेचा मोर्चा

सातारा- पाटण तालुका कृषी अधिकाऱ्यांना विक्रमबाबा पाटणकर यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कृषी संघटना शनिवार, दि.1 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता कृषी अधीक्षक कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चात वर्ग एक ते चार सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

गुरुवारी मल्हारपेठ, ता.पाटण येथे आयोजित हुमणी कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन कार्यक्रमाच्या ठिकाणी विक्रमबाबा पाटणकर यांनी पाटण तालुक्‍यात पडलेल्या ओला दुष्काळाकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या श्रीमुखात लगावली होती. या नंतर पाटणकर यांच्यासह 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍याच्या ठिकाणी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून पाटणकर यांचा निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता शनिवारी जिल्हयातील सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी मोर्चा काढणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)