मारहाणीची फिर्याद देणाऱ्यास अरेरावी

पोलिसांविरोधात गुरसाळे ग्रामस्थ रस्त्यावर : कडकडीत बंद

वडूज, दि. 4 (प्रतिनिधी) – मारहाण आणि चेन चोरीच्या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या गुरसाळेतील युवक, पोलिस पाटील यांनाच पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी वडुज रस्त्यावर सुमारे पाच तास रास्तारोकोही केला. दरम्यान, यावेळी शहानिशा न करताच पोलिसानी फिर्यादीच्या वकिलासही अटक केल्यामुळे वकील संघटनेनेही एक दिवस काम बंद ठेवून जाहीर निषेध केला.

याबाबतची अधिक माहिती अशी, गुरसाळे येथील राजू शेंडगे या बेकरी व्यावसायिकास परिसरातील काही युवक नाहक त्रास देत होते. गावातील युवा कार्यकर्ते जीवन विष्णू जाधव यांनी एकास फोनवरुन विचारला. त्याचा राग मनात धरुन बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास गावातील सौरभ विजय कुलकर्णी, सुमित विजय कुलकर्णी, सौरव जाधव, सुनिल माने, तसेच उंबर्डे येथील सचिन पवार यांनी कारमधून येवून जीवन जाधव यांना बेदम मारहाण केली व दोन तोळ्याची चेन हिसकावून घेतली. यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत घालून उंबर्डे फाट्यावर आणले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या पोलीस पाटील नितीन जाधव, उल्हास जाधव, विष्णू जाधव व इतरांनी त्यांची संबंधितांच्या तावडीतून सुटका केली.
याची तक्रार देण्यासाठी जीवन जाधव, पोलिस पाटील नितीन जाधव पोलिस ठाण्यात गेले होते. ते भांडणाचे कारण व इतर माहिती सांगत असताना पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांना अर्वाच्य भाषा वापरून धमकी दिली. याची माहिती कळताच संतप्त ग्रामस्थांनी निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी दिवसभर बंद पाळण्याबरोबर सकाळापासून सुमारे पाच तास रास्तारोको आंदोलन केले. तसेच तक्रारीची खातरजमा न करता वकील संघटनेचे सचिव ऍड. रोहन जाधव यास अटक केल्याबद्दल वकील संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करत एक दिवस काम बंद ठेवून घटनेचा तीव्र निषेध केला.
दरम्यान, दुसऱ्या फिर्यादीत शिवाजीराव पवार रा. उंबर्डे यांनी माजी सरपंच प्रताप जाधव, विष्णू जाधव, जीवन जाधव, ऍड. रोहन जाधव, खुदबुद्दीन शिकलगार, महेश वाघ या सहा जणांवर मारामारी व चेन चोरीची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी जीवन जाधव व ऍड. जाधव यांना पोलीसांनी बुधवारी रात्री अटक केली. तर दुसऱ्या दिवशी सचिन पवार यास अटक करण्यात आली.

ऍड. जाधव यांच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष ऍड. कालेकर यांच्यासह सुमारे 40 वकीलांनी न्यायालयापुढे वकीलपत्र सादर केले. एकंदर परस्थितीचे गांभीर्य पाहून पाहत न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी न मागता थेट न्यायालयीन कोठडी मागितल्याप्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)