मारहाण,विनयभंगाच्या परस्पर तक्रारी

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) – सातारा तालुक्‍यातील तासगाव येथे मारहाण व विनयभंगाच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. नितीन मोहन देशमुख यांनी चौघांच्याविरोधात मारहाणीची तक्रार दिली. तर एका युवतीने नितीन देशमुख याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली आहे. या दोन्ही तक्रारी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
नितीन मोहन देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,आशितोष दत्तात्रय जाधव,रणजीत ताटे,श्रीराम जाधव,प्रणय घोरपडे यांनी तू मोबईलवर मेसेज का करतो. असे म्हणत दांडक्‍याने मारहाण केली. यात नितीन यांच्या हाताला दुखापत झाली आहे. तर एका युवतीने नितीन देशमुख याने दुचाकी आडवी लावत तसेच घरात कोणी नसताना भाऊ कोठे आहे. असे विचारण्याच्या बहाण्याने विनयभंग केल्याची तक्रार दिली आहे. मारहणीच्या तक्रारीचा तपास पो.उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत. तर विनयभंगाच्या तक्रारीचा तपास पो.नि.प्रदीप जाधव करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)