मारहाणप्रकरणी 6 जणांना अटक

चिंचवड – येथील दुर्गामातानगर येथे आठ जणांनी घरात घुसून एका महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 10) रात्री आठ वाजता घडली.

या प्रकरणी मिरा सचिन अस्वरे (वय-34, रा. दुर्गामातानगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सोनाली महादू पवार, खुशी माने, कमल दौंडकर, अश्‍विनी, परशुराम भिवा दौंडकर, गणेश भास्कर यांच्यासह आठ जणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कामावरुन रात्री घरी परत आल्या असता त्यांच्या घरच्यांना मारहाण झाल्याचे व घरातील सामानाची तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)