मारहाणप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

कराड – आमचे विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरुन कराडमधील सहाजणांनी गोटे, ता. कराड यांना मारहाण केल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी शब्बीर महामुद सय्यद (वय 59, रा. गोटे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कमरअली वाहिद मुत्तवल्ली, उबेद मुजावर, सनी मुजावर, राहिल मुत्तवल्ली, साकीब मुत्तवल्ली, नाजीम सय्यद (सर्व रा. दर्गामोहल्ला गुरुवार पेठ, कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांचा भाचा इरफान जावीद सय्यद हा त्यांच्या घराशेजारी राहण्यास आहे. त्याच्याकडे वसीम मुजावर हा कामासाठी आल्यावर त्याचा आणि वसीमचा वाद झाला. त्यामुळे इरफान याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन सय्यद यांचा मुलगा शोएब यास शिवागाळ करुन दमदाटी करण्यात आली होती. त्यामुळे शोएब यानेही पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन संबंधित सहाजणांनी सय्यद यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना गोटे येथे जावुन मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यावरुन संबंधित सहा संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)