मारहाणप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांना शिक्षा

पुणे- येरवडा परिसरातील शिपाई कॉलनी येथे एका घरावर अतिक्रमण करून बेकायदा घर बांधणाऱ्याविरुद्ध पुणे महापालिकेत तक्रार केल्याच्या रागातून मारहाण केल्याच्या प्रकरणात एकाच घरातील चौघांनी दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे.

शिक्षा झालेल्यांमध्ये पिंपरी चिंचवडमधील एका शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या महिलेचा समावेश आहे. आरोपींना सुनावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतील 5 हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. युवराज विष्णू रणदिवे (वय 50), मयूर युवराज रणदिवे (23), माया युवराज रणदिवे (45), मंदार युवराज रणदिवे (19 सर्व रा. शिवाई कॉलनी, जाधवनगर, येरवडा) या चौघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी जीवन भिमसेन वाघमारे यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही घटना 24 नोव्हेंबर 2010 रोजी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फिर्यादींचा जबाब नोंदविण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी पाहिले. त्यांनी या खटल्यात दहा साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजात येरवडा पोलीस स्टेशनचे हवालदार राहुल शिंदे यांनी सहकार्य केले.
फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह शिपाई कॉलनी जाधवनगर येथे राहतात. त्यांच्या वस्तीत राहणारा युवराज रणदिवे याने फिर्यादीच्या घराच्यावर अनधिकृत घर बांधले. आरोपींच्या घरातील पाणी फिर्यांदीच्या घरात गळत असल्यामुळे त्यांनी वारंवार आरोपींना समजावून सांगितले होते. त्याबाबत फिर्यादींनी पुणे मनपा अतिक्रमण विभागाकडे अर्ज केला होता. पालिकेने आरोपींना नोटीस दिली. त्याचा आरोपींच्या मनात राग होता.

याचा राग धरुन आरोपींनी घटनेच्या दिवशी फिर्यादींच्या घरात घुसून अतिक्रमण विभागात तक्रार करतो का, असे म्हणत धारदार शस्त्राने, लोखंडी पाईपने मारहाण करुन फिर्यादीला गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या पत्नीला हाताने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. शेजारी राहत असलेल्या लोकांनी त्यांचे भांडण सोडविले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. बी. राऊत यांनी केला. न्यायालयाने आरोपींना याप्रकरणी शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)