मारणेवाडीच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे झुकते माप- चांदेरे

पिरंगुट- मारणेवाडी गावाची एकी मजबूत आहे. सार्वजनिक विकासकामांबरोबरच सामाजिक समतोल राखण्यात गावकरी पुढे आहेत. म्हणूनच मारणेवाडीच्या विकासाला राष्ट्रवादी कॉंग्रेसने झुकते माप दिलेले असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले. मारणेवाडी (ता. मुळशी) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे, माजी पंचायत समिती सदस्य सखाराम मारणे, माऊली कांबळे, उपसरपंच विजय मारणे, भिकानाना मारणे, भरत मारणे, माजी सरपंच विजय मारणे, भाऊ मारणे, अनिल चांदेरे, अंकुश बांदल, राजेंद्र मारणे व ग्रामस्थ उपस्थित होते. अध्यक्ष महादेव कोंढरे म्हणाले, आंबेगाव मारणेवाडी परिसराचा कायापालट हा राष्ट्रवादीच्या माध्यमातुन झालेला आहे. मागच्या निवडणूकीतील चुका सुधारून लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे यांना शक्ती देण्यात मारणेवाडीकरांनी पुढे यावे. भविष्यात अधिकची विकासकामे करण्याची जबाबदारी आमची राहील. जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने विकासकामांना निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले. भरत मारणे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र मारणे यांनी केले. भिकानाना मारणे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)