मारकुट्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत

डीवायएसपी टिके यांचे आश्‍वासन:वाई तालुक्‍यातील पत्रकारांनी घेतली भेट 

सातारा, दि. 6(प्रतिनिधी)- दैनिक प्रभातचे भुईंजचे वार्ताहर समीर मेंगळे यांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद गुरुवारी जिल्हाभर उमटले. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी घेतली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून मारकुट्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.दरम्यान वाई पोलिसांच्या दांडगाईचा सातारा जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तालुका पत्रकार संघाकडून निषेध करण्यात आला.

वाई तालुका पत्रकार संघाने गुरुवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना निवेदन सादर करून मेंगळे यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला. मेंगळे हा दि. 3 डिसेंबर रोजी वाई बसस्थानकात वार्ताकंन करत असताना वाई पोलीस ठाण्याचे स.पो.नि बबन येडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेंगळे यांना घटनास्थळी अपशब्द वापरले. दमदाटी करून त्यांना पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केली. त्यांना धमकी देऊन मोबाईल सुद्धा काढून घेतला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा वाई तालुका पत्रकार संघ तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा पत्रकारांनी यावेळी दिला. यावेळी दैनिक प्रभातचे निवासी संपादक मुकुंद फडके, ब्युरो चिफ जयंत काटे,प्रतिनिधी प्रशांत जाधव,गुरूनाथ जाधव यांच्यासह वाई तालुका पत्रकार संघाचे जयवंत पिसाळ, महेंद्र गायकवाड, भद्रेश भाटे, यशवंत कारंडे, धनंजय घोडके , सुशिलकुमार कांबळे, संजीव वरे, पांडुरंग भिलारे, निलेश जायगुडे, अशोक येवले, दौलतराव पिसाळ, शिवाजीराव जगताप, बाळासाहेब सणस, अनिल काटे, अमोल भंडारी ,पुरषोत्तम डेरे इ . पत्रकार उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी अजित टिके यांनी घडलेल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त करत सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष एस. एम. देशमुख,कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)