मायेने देणे आणि पैशाने घेणे यात मोठा फरक

श्रीनिवास पाटील : समन्वय पुरस्काराचे वितरण

पुणे – गोळ्या औषधे देण्यापासून ते ड्रायव्हर म्हणून सगळ्या गोष्टी करण्यासाठी माणसे मिळतात. पण, मायेने देणे आणि पैशाने घेणे यात मोठा फरक आहे, असे मत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्‍त केले. ते समन्वय पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे मेघराज राजेभोसले, अभिनेत्री व नृत्यांगना मेघा घाडगे, समन्वय फाउंडेशनचे चंद्रजित कावडे, अजय भारद्वाज, शहाजी पाटील, उत्तम जावळे आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समन्वय पुरस्कारांतर्गत विजय गायकवाड (उद्योगभूषण पुरस्कार), लाला चिंचवडे (समाजभूषण पुरस्कार), महेंद्र निंबाळकर (आरोग्य समन्वय पुरस्कार), शैलेंद्र वेल्हेकर (समाज जागृती पुरस्कार), कांचन सरोदे (वीरपत्नी पुरस्कार), शामकांत काळे (उद्योग गौरव पुरस्कार), शरद बालवडकर (शिक्षण भूषण पुरस्कार), आराधना फाउंडेशन (कार्य समाजगौरव पुरस्कार) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये सन्मान सोहळा घेणे असा अडथळा रसिकांना आवडत नाही. तुम्ही रसिक कलाकारांना दाद देत आहात याचा आनंद वाटतो. तुमच्या शाबासकीने कलाकाराला प्रोत्साहन मिळते, पण वात्रटपणाने शिट्‌टया वाजवणे मला पटत नाही, असे म्हणत पाटील यांनी मधू कांबीकर आणि लोकनृत्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. व्यसनमुक्‍तीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्‍तींना पुरस्कार दिला याचे मला कौतुक वाटले. पण बाकी व्यसनांपेक्षा सध्या मोबाइलचे व्यसन सर्वात मोठे आहे. घरी वडील आल्यावर मुले हॅलो डॅडी म्हणतात आणि पुन्हा मोबाइलमध्ये डोके घालतात, ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे पाटील म्हणाले. निवेदिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रजित कावडे यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)